Friday, December 24, 2021

दोष आणि रोष..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

दोष आणि रोष

पैसे घेणारे सापडले,
देणारे अजून्हीअज्ञात आहेत.
पैसे देणारे आहेत म्हणूनच,
घेणारे पैसे खात आहेत.

घेणारंपेक्षा देणारावर,
आमचा जास्त दोष आहे !
गरजवंताला अक्कल नसते,
यावरही आमचा रोष आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-7796
दैनिक झुंजार नेता
24डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026