Thursday, December 9, 2021

सामाजिक ' सैराट ' पणा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

सामाजिक ' सैराट ' पणा

खोट्या-नाट्या प्रतिष्ठेपायी,
नको तेवढा त्रागा होतो आहे.
सामाजिक सैराटपणा,
पुन्हा पुन्हा जागा होतो आहे.

सामाजिक सैराटपणाचे,
निषेधाबरोबर समर्थन होते आहे!
सामाजिक अक्कल अशी,
पुन्हा पुन्हा गोते खाते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6346
दैनिक पुण्यनगरी
9डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...