Friday, December 10, 2021

नटीच्या लग्नाला... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नटीच्या लग्नाला...

नटीच्या लग्नाला सतराशे कॅमेरे,
अशीच आजकाल तऱ्हा आहे.
चॅनल चॅनलचा जागरण गोंधळ,
आपण न पाहिलेलाच बरा आहे.

नट- नट्यांच्या लग्नामध्ये,
चॅनलवाले दिवाने होत आहेत!
हळदीपासून हनीमूनचा आढावा,
अगदी पोरकटपणाने घेत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6347
दैनिक पुण्यनगरी
10डिसेंबर2021

 

1 comment:

KABADE VISHWESHWAR said...

In short but to the point sir!👌👍

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...