Friday, December 24, 2021

कोरोनाची रडकथा...मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
---------------------------

कोरोनाची रडकथा

कोरोना नियमांची दहशत,
कोरोना तर दादा आहे.
आपल्या मूलभूत हक्कांवरही,
त्याची उठता-बसता गदा आहे.

नाक तोंड दाबलेले,
भडकलेला माथा आहे !!
शिस्त पाळतो,पण नियम आवरा;
अशी कोरोनाची रडकथा आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6360
दैनिक पुण्यनगरी
24डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...