Tuesday, December 28, 2021

बॅनरबाजी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

बॅनरबाजी

कार्यकर्त्यांच्या बोकांडी,
आपल्या नेत्यांचे फोटो.
आईबापांचे उपकार,
फिटायचे तेव्हा फिटो.

कार्यकर्त्यांसाठी नेते,
जरी गॉडफादर आहेत !
नेत्यापेक्षाही आदरणीय,
फादर अँड मदर आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6364
दैनिक पुण्यनगरी
28डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...