Saturday, December 11, 2021

पेपरफुटी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पेपरफुटी

ढगफुटी आणि पेपरफुटी,
आता नित्याची झाली आहे.
असत्याची चंगळ होऊन,
गोची सत्याची झाली आहे.

सत्य होते सपशेल फेल,
असत्याला क्रेडीट द्यावे लागते !
पेपरफुटी होण्यासाठी,
कुंपणाने शेत खावे लागते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7784
दैनिक झुंजार नेता
11डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...