Monday, December 13, 2021

सत्तेचे गुणधर्म... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सत्तेचे गुणधर्म

जो वाटतो संयमी,
त्यालाही सत्ता घसरायला लावते.
जो असतो शब्दाला पक्का,
त्यालाही सत्ता विसरायला लावते.

सत्ता साधीसुधी नाही,
सत्ता तर नटरंगी नार आहे.
सत्ता समाधानाने नांदत नाही,
तिचा कुणीतरी यार आहे.

जो सत्तेभोवती नाचतो
त्यालाच सत्ताही नाचवत राहते !
आपले सगळे गुण अवगुण
सत्ता लोकांपर्यंत पोचवत राहते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6350
दैनिक पुण्यनगरी
13डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...