Tuesday, December 14, 2021

हॅकिंग न्यूज...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

हॅकिंग न्यूज

हॅकिंगची बातमी ऐकून,
कुणीही क्रॅक होऊ शकते.
आता पंतप्रधानांचेही अकाउंट,
प्रयत्नाअंती हॅक होऊ शकते.

त्यांच्या हाती केवळ सत्ता नाही,
कोट्यावधी भक्तांचे बळ आहे!
तुमचे आणि आमचे अकाऊंट,
हॅकर्सच्या डाव्या हातचा मळ आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7787
दैनिक झुंजार नेता
14डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026