Monday, December 20, 2021

सडक छाप कार्यक्रम..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सडक छाप कार्यक्रम

रस्ते म्हणजे गुलाबी गाल नकोत,
पण तेही नीट द्यायला नकोत?
आमची कंबरडी शाबूत राहून,
हाडं खिळखिळी व्हायला नकोत.

नीटनेटक्या रस्त्यांच्या घोषणांची,
खड्ड्या- खड्ड्यात धूळफेक आहे!
सत्ताधाऱ्यांची आदला-बदली तरी,
सडकछाप कार्यक्रम एक आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7792
दैनिक झुंजार नेता
20डिसेंबर2021

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...