Thursday, December 23, 2021

लोकशाहीची पूजा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

लोकशाहीची पूजा

अधिवेशन आणि गोंधळ,
एकच नाण्याच्या दोन बाजू.
लोकशाहीचे भक्त म्हणतात,
चला आपण लोकशाही पुजू.

लोकशाही होते जखमी,
लोकशाहीला इजा असते !
गोंधळ आणि राडा म्हणजे,
लोकशाही ची पूजा असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7795
दैनिक झुंजार नेता
23डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026