Monday, December 27, 2021

झिंग झिंग झिंगाट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

झिंग झिंग झिंगाट

कुणी याच्यात गुंग आहे,
कुणी त्याच्यात दंग आहे.
जाणीवपूर्वक चढवलेली
हवीहवीशी झिंग आहे.

जशी झिंग अजाणता आहे,
तशी झिंग जाणता आहे !
वास्तवाचे भान विसरलेली,
झिंगबाज जनता आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7799
दैनिक झुंजार नेता
27डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...