Wednesday, December 15, 2021

घोडे-बाजार...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

घोडे-बाजार

बाजार दिसला रे दिसला की,
घोडे उधळायला लागतात.
तोबऱ्यावर तोबरे भरून,
आनंदाने खिदळायला लागतात.

जसा असतो बाजार,
तसा घोड्यांना भाव दिला जातो !
वारेमाप खोगीर भरती करून,
घोडेबाजाराला वाव दिला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6352
दैनिक पुण्यनगरी
15डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026