Wednesday, December 8, 2021

अलिप्ततावाद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

अलिप्ततावाद

आपल्याला त्याचे काय करायचे?
सगळे असाच विचार करत आहेत.
म्हणूनच तर कितीतरी बदमाश,
आज उजळ माथ्याने फिरत आहेत.

सगळ्या बदमाशांपेक्षाही,
लोकच खरी महाबदमाशी करतात!
बदमाशांना पवित्र करण्यासाठी,
अलिप्ततावादीच काशी करतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6345
दैनिक पुण्यनगरी
8डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...