Monday, December 20, 2021

गुलाब आणि गाल...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

गुलाब आणि गाल

हे बिहार नाही;महाराष्ट्र आहे,
बोलताना पाटील विसरले गेले.
गुळगुळीत रस्त्यावरून,
गुलाब अलगद घसरले गेले.

रुपानं देखणी; रंगानं चिकणी,
बकरीलाही म्हणायची सोय नाही !
लालूचा ' प्रसाद ' असा वाटाल तर,
तुमचाही बकरा होऊ शकतो,
इथे कुणाचीसुद्धा गय नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6356
दैनिक पुण्यनगरी
20डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...