Monday, December 27, 2021

लबाडनामा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

लबाडनामा

हेही अट्टल लबाड आहेत,
तेही अट्टल लबाड आहेत.
त्यांच्याच घरी पहा,
किती मोठाले घबाड आहेत.

लबाडांच्या टोळ्या आहेत,
सच्चाईला गोळ्या आहेत.
सत्याचा विजय होईल,
आपल्या आशा भोळ्या आहेत.

लबाडांचा फळाफळाट आहे,
उधळतेचा खळखळाट आहे!
जो भोगावा लागतो तो,
शोषितांचा तळतळाट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6363
दैनिक पुण्यनगरी
27डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...