Tuesday, December 21, 2021

प्रचारनामा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

प्रचारनामा

निवडणुकांचा प्रचार म्हणजे,
उखाळ्या-पाखाळ्या झाल्या.
प्रचाराचा झाला अपप्रचार,
चक्क हशा आणि टाळ्या झाल्या.

कुणाचे प्रचार पोरकट वाटतात,
कुणाचे प्रचार तर्कट वाटतात.
सांगायलाही वाईट वाटते,
कुणी कुणी तर मर्कट वाटतात.

नको ते दळण दळून,
नको त्याचेच कांडण असते !
निवडणूक प्रचार म्हणजे,
थेट नळावरचे भांडण असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7793
दैनिक झुंजार नेता
21डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...