Friday, December 31, 2021

सवयीचे गुलाम... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
सवयीचे गुलाम
गुलामांना गुलामीतच,
जबरी मजा वाटते.
स्वातंत्र्य म्हणजे,
गुलामांना सजा वाटते.
मोकळ्या श्वासांचा
गुलामांना फास वाटतो.
गुदमरलेला श्वासच,
गुलामांना खास वाटतो.
गुलामी जिंदाबाद,
गुलामांचा नारा असतो!
सवयींच्या गुलामांचा,
शून्यावर पारा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7802
दैनिक झुंजार नेता
31डिसेंबर2021
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...