Wednesday, December 29, 2021

प्राण्यांचा संवाद... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

प्राण्यांचा संवाद

कुत्रे झाले,मांजर झाले,
अजून कुणाचे नंबर असतील.
याची कल्पनाही नव्हती,
आपले एवढे मेंबर असतील.

लोकशाहीच्या सभागृहात,
आपलाच गवगवा आहे !
आपल्या प्राणी विश्वाचा,
लोकप्रतिनिधींना हेवा आहे.

लांडगा लबाडीने म्हणाला,
बिल्ली मांजर चोंबडी आहे!
बारा आण्याच्या मसाल्यासाठी,
चार आण्याची कोंबडी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6366
दैनिक पुण्यनगरी
29डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026