Sunday, December 19, 2021

काळजी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

काळजी

नेत्यांना असते लेकरांची काळजी,
आपण त्याला घराणेशाही म्हणतो.
नेते कितीही चांगले वागले तरी,
आपण त्याला काही-बाही म्हणतो.

घराणेशाहीच्या मार्गानेच,
नेत्यांकडून लोकशाही जपली जाते!
लोक आणि लोकशाहीची नाळ,
मोठया काळजीपूर्वक कापली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7791
दैनिक झुंजार नेता
19डिसेंबर2021
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...