Thursday, December 23, 2021

थंडीचे अनुभव...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

थंडीचे अनुभव

दातावर दात आदळले की,
थंडी जोरात वाजू लागते.
आपल्यावरचे उपाय पाहून,
थंडी जोरात लाजू लागते.

ज्याच्या त्याच्या पेयाचा,
कडू अथवा गोड घोट असतो.
ज्याचे त्याचे उपाय ठरलेले,
जसा ज्यांचा वयोगट असतो.

थंडीच्या अनुभवाचे सुख-दुःख,
तसे सांगण्यासारखे खूप आहे !
प्रत्येकाला वेगळे भावणारे,
कुडकुडत्या थंडीचे रूप आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6359
दैनिक पुण्यनगरी
23डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...