Wednesday, December 22, 2021

बहिष्काराची पूर्वसंध्या..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

बहिष्काराची पूर्वसंध्या

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच,
विरोधकांचा पवित्रा जोखला जातो.
परंपरा म्हणून चहापानावर,
हमखास बहिष्कार टाकला जातो.

चहापानावरचा बहिष्कार म्हणजे,
अधिवेशनाचे प्रायमिंग असते !
पूर्वग्रह आणि पूर्वसंध्या यांचे,
अगदी अचूक टायमिंग असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6358
दैनिक पुण्यनगरी
22डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...