Tuesday, December 28, 2021

ऑपरेशन दृष्टीदोष .. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

ऑपरेशन दृष्टीदोष

निवडणुकीपुरती समाजसेवा,
अशी म्हण प्रचलित होऊ लागली.
सच्चा समाजसेवकाकडे बघण्याची,
लोकांची दृष्टी विचलित होऊ लागली .

समाजसेवकांच्या उमेदवारीने,
मतदार राजा खुश व्हायला हवा!
कुणीतरी करून ठेवलेला,
समाजाचा दृष्टीदोष जायला हवा!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7800
दैनिक झुंजार नेता
28डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...