Wednesday, December 29, 2021

फलश्रुती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

फलश्रुती

ज्यांनी गोंडे घोळले आहेत,
जे पायावर लोळले आहेत.
त्यांनाही झळ बसून बसून,
तेही जाम पोळले आहेत.

महत्त्व तुमच्या कार्याला नाही,
महत्त्व तुमच्या धैर्याला नाही !
इथे असे क्षेत्रच नाही,
सलाम उगवत्या सूर्याला नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7801
दैनिक झुंजार नेता
29डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...