Tuesday, December 7, 2021

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

ऐतिहासिक विकृती

एकीकडे खोट्या इतिहासाशी,
खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे.
दुसरीकडे विकृत इतिहासाच्या,
विकृत आवृत्या काढणे चालू आहे.

संयम आणि सामंजस्यालाही,
विकृती स्विकृती समजते आहे!
संविधानिकऐवजीअसंविधानिक,
भाषाच विकृतीला उमजते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7780
दैनिक झुंजार नेता
7डिसेंबर2021
----------------

 

No comments:

daily vatratika...29jane2026