Wednesday, December 22, 2021

कठाळे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

कठाळे

ज्यांच्या भानगडीवर भानगडी,
घोटाळ्यावर घोटाळे असतात.
नेमके तेच सगळे लोक,
आपण पोसलेले कठाळे असतात.

आपण पोसलेलल्या कठाळ्यांचा,
माजावरती माज वाढत जातो !
गोरगरीब गायांचा बळी मग,
माजोर कठाळ्यांपुढे पडत जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7794
दैनिक झुंजार नेता
22डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...