Tuesday, December 7, 2021

नाद खुळा !....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

नाद खुळा !

आपल्याच पायावरती,
आपलाच धोंडा असतो.
जेव्हा सत्ता एके सत्ता,
एवढाच अजेंडा असतो.

सत्ता हेच ध्येय होते,
सत्ता हेच धोरण असते.
सत्ता हाच संकल्प,
सत्ता हेच तोरण असते.

सत्तेच्या नियमाला,
कुणीही अपवाद नाही!
असा पक्ष शोधून दाखवा,
ज्याला सत्तेचा नाद नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6344
दैनिक पुण्यनगरी
7डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...