Saturday, December 18, 2021

फोडाफोडीची स्पर्धा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

फोडाफोडीची स्पर्धा

आधी पेपर फोडतो कोण?
परीक्षेत परीक्षेत स्पर्धा आहे.
पेपर फुटीच्या साथीमध्ये,
गुणवंतांचा खुर्दा आहे.

गुणवंतांचा होतो खुर्दा,
यश लखपतींच्या हाती आहे !
पेपरफोड्याच पेपरपफोड्यांचा,
उघड उघड साथी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7791
दैनिक झुंजार नेता
18डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...