Friday, December 10, 2021

नटीच्या लग्नाला... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नटीच्या लग्नाला...

नटीच्या लग्नाला सतराशे कॅमेरे,
अशीच आजकाल तऱ्हा आहे.
चॅनल चॅनलचा जागरण गोंधळ,
आपण न पाहिलेलाच बरा आहे.

नट- नट्यांच्या लग्नामध्ये,
चॅनलवाले दिवाने होत आहेत!
हळदीपासून हनीमूनचा आढावा,
अगदी पोरकटपणाने घेत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6347
दैनिक पुण्यनगरी
10डिसेंबर2021

 

1 comment:

KABADE VISHWESHWAR said...

In short but to the point sir!👌👍

योजनांचे नामांतर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- योजनांचे नामांतर जेव्हा कधी बदलते सत्ता केंद्र, तेव्हा राजकीय कावे बदलले जातात. चालू असलेल्या सरकारी ...