Friday, December 5, 2025

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका
----------------------------
ऑपरेशन फोडाफोडी
आज यांचे त्यांचे फुटले,
उद्या दुसऱ्याची बारी आहे
ऑपरेशन फोडाफोडी,
सगळीकडूनच जारी आहे.
फोडताना गोड गोड वाटते,
फुटले की तोंड कडू आहे!
ज्यांचे फुटले आणि फोडले,
तो त्यांचाच तर भिडू आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 41
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
5 डिसेंबर 2025

 

बकरी म्हणाली बकरीला ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
बकरी म्हणाली बकरीला
तपोवनाच्या वृक्षवादात,
धार्मिकतेचा नखरा आहे.
बकरी म्हणाली बकरीला,
तुझा माझा बकरा आहे.
युक्तीवादासाठी युक्तिवाद,
अगदी बिनतोड वाटू शकतो.
धर्मांधाला धर्मांध भेटला की,
त्यालाही सहज पटू शकतो.
विरोधाला विरोध करताना,
त्यात धार्मिकतेचा सूर आहे !
बिनतोड तोडगा निघू शकतो,
अजून घोडा मैदान दूर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9114
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5 डिसेंबर2025
 

Thursday, December 4, 2025

तपोभूमीचा ताप

आजची वात्रटिका
----------------------------

तपोभूमीचा ताप

थंडीच्या वाढत्या लाटेमध्येही,
नाशिकचे तपोवन तापू लागले.
नवे आणि जुने पर्यावरणवादी,
सगळेच्या सगळे झापू लागले.
वृक्ष रक्षणाच्या आग्रहाबरोबर,
दांभिकतेचीही खिल्ली आहे !
संत महंतांच्या कुंभमेळ्यासाठी,
संत विचारांची पायमल्ली आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 40
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
4 डिसेंबर 2025
 

कायदेशीर उपाय....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
कायदेशीर उपाय
कुणाच्या मते योग्य झाले,
कुणाच्या मते रॉंग आहे.
मतदान यंत्रांची रूम म्हणाली,
मी तर जास्तच स्ट्रॉंग आहे.
उत्सुकता ताणली गेली,
तिचासुद्धा नवा ताण आहे.
संशयाच्या भुतावळीला,
पुन्हा नव्याने जान आहे.
कुणाला वाटतो गलथानपणा,
कुणाला वाटतो डाव आहे !
विरोधकांच्या शंका कुशंकांना,
आता तर भलताच वाव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9113
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 डिसेंबर2025

 

Wednesday, December 3, 2025

लोकशाही अमर हैं !....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
लोकशाही अमर हैं !
कुठे कुठे पैशांची देव ठेव,
कुठे बोगसगिरीचे शिक्षण आहे.
लोकशाही जिवंत असल्याचे,
हेच तर खरेखरे लक्षण आहे.
लोकशाही गेली उडत,
प्रत्येकाला स्वार्थ प्यारा आहे !
लोकशाहीचा गळा दाबून,
तिच्या अमरत्वाचा नारा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 39
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
3 डिसेंबर 2025

 

लोकशाही प्रदर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
लोकशाही प्रदर्शन
लोकशाहीची चालली टिंगल,
लोकशाहीची उघड थट्टा आहे.
लपून छपून काहीच नाही,
लोकशाहीला उघड बट्टा आहे.
जेवढी लोकशाही टिकाऊ,
तेवढीच लोकशाही विकाऊ आहे.
वाढत्या बेबंदशाहीपुढे,
आपली लोकशाही टाकाऊ आहे.
वाढत्या धनदांडगेशाहीकडे,
आपली लोकशाही गहाण आहे !
आपल्या समाधानासाठी म्हणायचे,
आपली लोकशाही महान आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9112
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 डिसेंबर2025

 

रेडचा सिग्नल....आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका
-------------------------------
रेडचा सिग्नल
काय डोंगर?काय झाडी? काय हॉटेल?
या सगळ्याचा खरा अर्थ कळतो आहे.
सगळे कसे ओकेमध्ये असतानाही,
'रेड' चा सिग्नल खोलवर छळतो आहे.
पडलेल्या रेडचे सिग्नलही,
ज्याच्या त्याच्याकडे भिन्न भिन्न आहेत !
तरीही झुकेगा नही साला....
डायलॉग मारणारे चेहरे खिन्न आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 38
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
2 डिसेंबर 2025
 

Tuesday, December 2, 2025

नवा शोध...नवे उत्तर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
नवा शोध...नवे उत्तर
कुणाच्या बाजूने कोण आहेत?
कुणाच्या कोण विरोधात आहेत?
दरवेळी उत्तर चुकल्याने,
लोक अजूनही ह्याच शोधात आहे.
जसा त्यांचा त्यांनाच ताळमेळ नाही,
तसा जनतेलाही त्याचा ताळमेळ नाही.
तरीही नेहमीच हाउसफुल ठरतो,
हा दिसतो तेवढा साधा खेळ नाही.
दरवेळी प्रश्न कायम असला तरी,
दरवेळी त्याचे उत्तर वेगवेगळे असते !
नव्या समीकरणाची नवी सिद्धता,
याच्या मध्येच तर सगळे असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9111
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 डिसेंबर2025

 

Monday, December 1, 2025

मर्यादाभंग ...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
मर्यादाभंग
स्थानिक पातळीवरील निवडणुकीत,
जेवढे राजकीय करार गोत्यात आहेत.
यापूर्वी कधीच झाले नसतील,
तेवढे भेदभाव त्यांच्या नात्यात आहेत.
सगळे करार बिरार मोडून तोडून,
सर्वांना समोरच्यावर घसरावे लागते !
नव्या निवडणुका;नव्या तडजोडी,
झाले गेले सगळ्यांना विसरावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 37
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
1 डिसेंबर 2025
 

निवडणूक परंपरा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका
------------------------
निवडणूक परंपरा
मूळ मुद्दे बाजूला सोडून,
नको त्याची चिवडणूक असते.
कोणतीही असली तरी,
अशीच तर निवडणूक असते.
लोकशाहीच्या नावाने,
सर्वांचीच ऊर बडवणूक असते.
लोकांचे ते उघडे करून,
आपली मात्र दडवणूक असते.
जे जे सच्चे आणि निष्ठावंत,
त्यांची दरवेळी सडवणूक असते !
असून अडचण नसून खोळंबा,
तरी लोकहिताची मढवणूक असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9110
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 डिसेंबर2025

Sunday, November 30, 2025

दैनिक वात्रटिका l 30नोव्हेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -154वा l पाने -57


दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l 30नोव्हेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -154वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन 226
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

नाराजी नाट्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नाराजी नाट्य

कुणाचे स्वप्न भंगवले जाते.
कुणाचे स्वप्न भंगले जाते,
निष्ठेचा तमाशा झाला की,
नाराजी नाट्य रंगले जाते.

ज्यांना ज्यांना संधी भेटते
त्यांची मात्र चांदी असते.
सर्वांच्या नाराजी नाट्याची,
वेगवेगळी नांदी असते.

सर्वांच्या कथा सारख्याच,
तरी वेगळे रंग देऊ लागतात !
सगळे यशस्वी कलाकार,
वेगळ्या भैरव्या गाऊ लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9109
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30 नोव्हेंबर2025
 

Saturday, November 29, 2025

घराणेशाहीचा विक्रम...साप्ताहिक सरकारनामा

साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------

घराणेशाहीचा विक्रम

नगरपालिकेच्या निमित्ताने,
तिकीट वाटपाचा विक्रम ठरला आहे.
घराणेशाहीने कुठे चौकार तर,
कुठे कुठे थेट षटकार मारला आहे.

सामान्य कार्यकर्त्यांची अवस्था,
सगळीकडेच वाईटाहून वाईट असते.
आपल्या पक्ष आणि नेत्यांसाठीच,
दरवेळी त्यांची फिल्डिंग टाइट असते.

निवडणूक कोणतीही असली तरी,
कार्यकर्ते गृहीत धरलेले असतात !
नेते आणि पक्ष जिंकले तरी,
सामान्य कार्यकर्ते हरलेले असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 62
वर्ष- दुसरे
29नोव्हेंबर 2025
 

लक्ष्मीची पाऊले

आजची वात्रटिका
-------------------

लक्ष्मीची पाऊले

तुमच्या घरी लक्ष्मी आली तर....
तिला कुणीच नाही म्हणू नका.
प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करा,
इमानदारीच्या गप्पा हाणू नका.

ज्याला त्याला वाटत आहे,
इथे मीच फक्त पापभिरू आहे !
लक्ष्मी घेऊन मतदान करा,
असा उघड अपप्रचार सुरू आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 35
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
29 नोव्हेंबर 2025
 

भूकंपांचा सुळसुळाट....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

भूकंपांचा सुळसुळाट

भूकंपाची वायफळ चर्चा,
भूकंपावरच बेतली आहे.
राजकीय भूकंपाने,
भूकंपाची चव घातली आहे.

छोट्या छोट्या हादऱ्यांनाही,
राजकीय भूकंप म्हटले जाते.
भूकंपाच्या अफवा उठविण्यात,
त्यांना समाधान भेटले जाते.

ज्यांनी केले राजकीय भूकंप,
आम्ही त्यांचे श्रेय लाटत नाही !
हल्ली भूकंपाच्या सुळसुळाटाचे,
कुणालाच काही वाटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9108
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29 नोव्हेंबर2025
 

Friday, November 28, 2025

घराणेशाहीचा अंदाज ...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
घराणेशाहीचा अंदाज
कुठे भावाविरुद्ध भाऊ आहे,
कुठे सासू विरुद्ध सून आहे.
भावकी विरुद्ध भावकीला,
घराणेशाहीचीच धून आहे.
घराण्याविरुद्ध घराणे आहे,
सोयऱ्याविरुद्ध सोयरा आहे !
घराणेशाहीचा अंदाज असा,
अंदाजपेक्षाही गहिरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 34
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
28नोव्हेंबर 2025

 

मतदार राजा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

मतदार राजा

कधी मतदार राजाची मनधरणी,
कधी मात्र त्याला दम दिला जातो.
राजासारख्या राजाचा,
दरवेळी नवा गेम केला जातो.

राजा राजा म्हणीत मतदारराजाचा,
बरोबर बॅंड बाजा वाजवला जातो.
कोणतीही निवडणूक आली की,
मतदारराजा उजवला जातो.

आपल्या प्रासंगिक राजेपणाला,
मतदारराजाही भुलला जातो !
एकदा निवडणूक सरली की,
मतदारराजा अलगद कोलला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9107
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28 नोव्हेंबर2025
 

Thursday, November 27, 2025

राजकीय धडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
राजकीय धडा
त्यांच्या राजकीय लढाया,
आपल्यासाठी गंमतीचा भाग आहे.
पण वास्तव बघून कळते,
हा राजकीय हिंमतीचा भाग आहे.
सगळे काही उघड उघड,
त्यांच्यात काहीसुद्धा छुपे नाही.
राजकीय मित्रांविरुद्ध लढणे,
कुणासाठीसुद्धा मुळीच सोपे नाही.
ते जसे झुकून दाखवतात,
ते तसे वाकवून दाखवू शकतात !
ते एकमेकांनाच काय ?
जनतेलाही धडा शिकवू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9106
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27 नोव्हेंबर2025

 

लोकशाहीची प्रगती.... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------------

लोकशाहीची प्रगती 

गल्लोगल्ली आणि वॉर्डा वॉर्डात,
प्रचाराची रणधुमाळी माजलेली आहे.
नगरपालिकेने दाखवून दिले, 
लोकशाही खोलवर रुजलेली आहे. 

आम्ही यावर ठाम असलो तरी,
तुम्ही मात्र ऑब्जेक्शन घेऊ शकतात !
यापुढे ग्रामपंचायतच्या प्रचाराला,
देशाचे पंतप्रधानसुद्धा येऊ शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 33
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
27नोव्हेंबर 2025
----------------------------
नमस्कार,
१)सदरील वात्रटिकेमध्ये मध्ये काही प्रिंट मिस्टेक असेल तर त्याची खात्री करावी.
२) एखादा शब्द अप्रस्तुत वाटत असला तरी
चर्चा करूनच तो बदलावा ही नम्र विनंती.

- सूर्यकांत डोळसे

दैनिक वात्रटिका l 26नोव्हेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -153वा l पाने -57


दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l 26नोव्हेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -153वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन 225
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...