आजची वात्रटिका
-------------------------------
कुणाकुणाला आत्ता आत्ता कळाले,
कुणाकुणाला आधीच ठाऊक आहेत.
सगळ्याच पक्षामधले कार्यकर्ते,
किती किरकोळ आणि घाऊक आहेत?
जेवढे विकाऊ, तेवढेच टाकाऊ,
एवढी पक्षात त्यांची किंमत आहे !
कार्यकर्त्यांशिवायही पक्ष चालू शकतो,
एवढी पक्षात राजकीय हिंमत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 61
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
1 जानेवारी 2026
