Sunday, February 20, 2022

राजकीय मर्डर....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

राजकीय मर्डर

मोसम दिला सोडून,
हे वेगळेच सलेक्शन आहे.
लोकांना वाटू लागले.
महाराष्ट्रात इलेक्शन आहे.

धडक्यावर धडाका,
अटॅक वर अटॅक आहे.
खळळ नाही,खुळळ नाही,
सगळे कसे खट्याक आहे.

आरोप-प्रत्यारोप रंगावेत,
पण त्याचीही एक बॉर्डर आहे !
शांतता आणि सुव्यवस्थेचा,
जणू राजकीय मर्डर आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6415
दैनिक पुण्यनगरी
20फेब्रुवारी 2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026