Friday, February 18, 2022

प्रस्थापित व्यवहार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

प्रस्थापित व्यवहार

कार्यकर्ते घोळले जातात,
कार्यकर्ते पाळले जातात.
सत्तेचा वाटा देताना मात्र,
कार्यकर्ते टाळले जातात.

तरी कार्यकर्ता खंदा असतो,
तरी कार्यकर्ता बंदाअसतो.
खरा इथेच होतो खरा वांधा,
खंदा कार्यकर्ता मिंधा असतो.

सगळा मामला फसवा असतो,
तेवढ्यापुरता रुसवा असतो!
चालत आले,चालत राहील,
व्यवहार बाजारबसवा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6413
दैनिक पुण्यनगरी
18फेब्रुवारी 2022

 

दैनिक वात्रटिका29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -327 वा

 दैनिक वात्रटिका 29एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -327 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Qdm8vBAFqaFmdkkt4Q3...