Tuesday, February 15, 2022

परंपरांचे पाईकत्व....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

परंपरांचे पाईकत्व
जो त्यांचा तोरा आहे,
तोच यांचाही तोरा आहे.
आम्ही खुशाल नागवे नाचू,
आमची ती परंपरा आहे.

जरी परस्परांच्या परंपरांचा,
परस्परांना जाच आहे.
तरी कालबाह्य परंपरांचा,
हल्ली असा नंगानाच आहे.

परंपरा समृद्ध असाव्यात,
परंपरा घातक नकोत !
पुण्याईचा धावा करताना,
पदरात पातक नकोत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7844
दैनिक झुंजार नेता
15फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 2फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 245वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 2फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 245वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1qU8GEqGqWwUmye7FEi...