Friday, February 4, 2022

भ्रष्टाचाराचा तळतळाट...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
भ्रष्टाचाराचा तळतळाट
भ्रष्टाचारी एकटा-दुकटा नसतो,
भ्रष्टाचाऱ्यांची साखळी असते.
भ्रष्टाचारतल्या कमाईची,
फुल ना फुलाची पाकळी असते.
तुम्ही देतात,म्हणून ते घेतात,
यावर त्यांचा फळफळाट असतो!
भ्रष्टाचाऱ्यांचे कवाड लागण्यामागे,
शोषितांचा तळतळाट असतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6400
दैनिक पुण्यनगरी
4फेब्रुवारी 2022

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...