आजची वात्रटिका
----------------------------
ट्राफिक जाम
चांगले सुर आळवायचे सोडून
आता तर नवे पिल्लू सोडले आहे.
ट्राफिक जाम चे नाते,
थेट घटस्फोटाशी जोडले आहे.
हास्यास्पद विधानांची,
सगळीकडेच धूम धाम आहे !
त्यांचे नक्की घटस्फोट होतील,
जिथे संवादाची ट्राफिक जाम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6401
दैनिक पुण्यनगरी
5फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment