आजची वात्रटिका
----------------------------
शिवनेरी म्हणाला रायगडाला
गड्या,आपल्या मावळ्यांची,
आज सगळी दाणादाण आहे.
पक्षीय खिंडीत अडकलेली,
आपल्या मावळ्यांची मान आहे.
गोतास काळ झालेले,
आपलेच तर दांडे आहेत.
आज-काल मावळ्यांच्या हाती,
वेगवेगळे झेंडे आहेत.
मावळ्यांची शक्ती आणि भक्ती,
मोठ्या युक्तीने मारली आहे !
मावळयांनीच मावळ्यांना,
कायमची धूळ चारली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6414
दैनिक पुण्यनगरी
19फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment