Friday, February 18, 2022

ऋतू आणि हेतू..... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ऋतू आणि हेतू

राजकीय आरोपांचा,
वेगवेगळा ऋतू असतो.
आरोपही वेगवेगळे,
जसा ज्यांचा हेतू असतो.

ऋतू आणि हेतूनुसार,
आरोपांची तोफ डागली जाते.
ढगात मारलेली गोळी,
नक्की कुठेतरी लागली जाते.

जेवढे असतात ढग,
तेवढ्या गोळ्या असतात !
तेच पिकवतात हसू,
त्यांच्याच टाळ्या असतात !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7846
दैनिक झुंजार नेता
18फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 2फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 245वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 2फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 245वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1qU8GEqGqWwUmye7FEi...