Saturday, February 5, 2022

पाणाडे... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पाणाडे

पायाळू पायाळू म्हणीत,
झुकणाराला झुकवू लागले.
सकाळी पाणी न नेणारेही,
लोकांना पाणी दाखवू लागले.

उघड उघड फसवाफसवी,
सगळा विषय डेरिंगचा आहे!
इंचा इंचाचा हिशोब मांडा,
शेवटी हा मामला बोरिंगचा आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7835
दैनिक झुंजार नेता
5फेब्रुवारी 2022

 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...