Friday, February 11, 2022

मान - मर्यादा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

मान - मर्यादा

कालची ती निरागसता,
आज विखारी ठरते आहे.
कालची ती निगर्वी श्रीमंती,
आज भिकारी ठरते आहे.

किती अजब? किती विचित्र?
सगळाच हा प्रकार आहे.
माणसे झाली जनावरे,
नजरेत फक्त विखार आहे.

शुद्ध करा आपल्या नजरा,
आपले अंत:करण शुद्ध ठेवा !
इतरांचा अंत नका पाहू,
आपापलीही एक हद्द ठेवा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7842
दैनिक झुंजार नेता
11फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 2फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 245वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 2फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 245वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1qU8GEqGqWwUmye7FEi...