आजची वात्रटिका
-----------------------
सपक्ष आणि नि:पक्ष
पहाटेचीही झोप उडवते,
तिचे नाव ईडी आहे.
उठता-बसता वाटू लागले,
आपल्याही हाती बेडी आहे.
कर नाही त्याला डर कशाला?
पापाची फळे चाखावे लागतील.
इकडचे टाकले तसे तिकडचेही,
गजा आड टाकावे लागतील.
सामान्य जनतेचेसुद्धा,
समान न्यायावर लक्ष आहे !
सखोल चौकशीअंती कळेल,
ईडी सपक्ष आहे की नि:पक्ष आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
24फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment