आजची वात्रटिका
----------------------------
प्रेमाचा सल्ला
प्रेमाचा गुलकंद करीत,
स्वप्नांचे ताजमहाल बांधू नका.
जा कबूतर जा....म्हणीत,
हातावर कुणाचे नाव गोंदू नका.
लैला मजनु,रोमियो ज्युलिएट,
तुमच्या डोक्यात हिर-रांझा आहे,?
तर मग याची खात्री समजा,
प्रेम नशा नाही, प्रेम गांजा आहे
प्रेमासाठी अट्टहास नकोत,
असे नाही सगळे सेम टू सेम आहे!
प्रेम म्हणजे काही फिल्म नाही,
प्रेम म्हणजे वेटींग गेम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7843
दैनिक झुंजार नेता
14फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment