Tuesday, February 22, 2022

खादाड खाऊ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

खादाड खाऊ

जसे येटाळ्यावर येटाळे,
चौकशीचे येटाळे आहेत.
तसे घोटाळ्यावर घोटाळे,
नव नवे घोटाळे आहेत.

येटाळ्यांचे व घोटाळ्यांचे,
अगदी जवळचे नाते आहे!
कितीही तोबरे भरले तरी,
घोडे पुन्हा पेंड खाते आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7850
दैनिक झुंजार नेता
22फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...