आजची वात्रटिका
----------------------------
राऊत विरुद्ध सोमय्या
त्यांना हात जोडून सांगा,
पायातली वहाण पायात बरी आहे.
ते शिव्या सर्टिफाइड करीत आहेत,
ही गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे.
मराठी जशी ओव्यांनी संपन्न आहे,
तशी मराठी शिव्यांनीही संपन्न आहे.
आपण हसावे की रडावे?
सामान्य जनता तर प्रचंड सुन्न आहे
आपण वाईटातही चांगले शोधू,
त्यामुळे नवी ऊर्जा प्राप्त होईल !
राऊत विरुद्ध सोमय्या वादामुळे,
मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होईल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6415
दैनिक पुण्यनगरी
21फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment