आजची वात्रटिका
----------------------------
खुर्ची प्रेम
नेते कुठले असू द्या,
त्यांचे सगळ्यांचेच सेम असते.
उत्कट प्रेमाचे उदाहरण म्हणजे,
नेत्याचे आणि खुर्चीचे प्रेम असते.
आपले तन, मन आणि धनही,
नेते खुर्चीसाठी उधळू शकतात.
आपले सगळे आयुष्यही,
नेते खुर्चीसाठी वादळू शकतात.
जात,धर्म,पक्ष आणि बापही,
खुर्चीसाठी बदलायची तयारी असते.
सगळ्याच नेत्यांना,
बघा खुर्ची केवढी प्यारी असते?
प्रेमाच्या सगळ्या कसोट्या,
खुर्ची प्रेमाला लावता येऊ शकतात!
खुर्चीसाठी नेते सैराट होऊन,
जीव देऊ आणि घेऊ शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6410
दैनिक पुण्यनगरी
14फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment