आजची वात्रटिका
----------------------------
अखेरचा हा तुला दंडवत....
तुझ्या स्वर्गीय आवाजाचे,
लता मंगेशकर झालीस नाव.
अखेरचा हा तुला दंडवत,
कायमची सोडून गेलीस गाव.
तुझ्या सुरांसोबत जन्मलो आम्ही,
तुझ्या सुरांसोबत जगतो आम्ही.
तुझ्या प्रत्येक गाण्या-गाण्यात,
आमचीच जिंदगी बघतो आम्ही.
हसलो आम्ही,रडलो आम्ही,
तुझ्या सुरांसोबत घडलो आम्ही.
तुझ्या सुरांनीच उठलो आम्ही,
जेव्हा जेव्हा कधी पडलो आम्ही.
आमच्या बेसूर आयुष्यातून,
अखेर तुझे गाणेही उणे झाले!
चिरंजीव गाणे तुझे,
आज मात्र रडगाणे झाले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
No comments:
Post a Comment