Tuesday, February 15, 2022

अडचणीचा मुद्दा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

अडचणीचा मुद्दा

कुणाचे स्फोटावर स्फोट,
कुणी पेरलेलेले सुरुंग आहेत.
अमक्या तमक्यांच्या नशिबात,
लवकरच म्हणे तुरुंग आहेत.

घाला घाला,खुशाल घाला,
परस्परांना तुरुंगात घाला.
सत्यमेव जयते, सत्यमेव जयते,
आम्ही बोलतो; तुम्हीही बोला.

कालचे मित्र आजचे शत्रू,
एकमेकांना नक्की नडू शकतात!
खरी अडचण एवढीच की,
आजचे तुरुंग अपुरे पडू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6411
दैनिक पुण्यनगरी
15फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -327 वा

 दैनिक वात्रटिका 29एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -327 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Qdm8vBAFqaFmdkkt4Q3...