Sunday, February 6, 2022

अरे देवा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
अरे देवा...
अजूनही देव इथे,
पुन्हा पुन्हा बाटतो आहे.
अजूनही देव इथे,
दगडातच भेटतो आहे.
तंगडी वर करून कुत्रा,
देवालाही चाटतो आहे.
देवाची ढाल करून,
जमेल तो लाटतो आहे.
देवधर्माच्या नावावर,
कुणी काहीही छाटतो आहे.
देव नावाच्या दगडाला,
कुठे पाझर फुटतो आहे?
बायांकडूनही बाटतो आहे,
गड्यांकडूनही बाटतो आहे !
जळी स्थळी काष्ठी पाषाणी,
देव दिवस रेटतो आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7836
दैनिक झुंजार नेता
6फेब्रुवारी 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...