Sunday, February 20, 2022

चवदार चविष्ट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

चवदार चविष्ट

आरोपावर आरोपांची,
रोज नवी-नवी लिस्ट आहे.
भुकेल्या न्यूज चॅनल साठी,
जणू नवी नवी फिस्ट आहे.

न्यूज चॅनलच्या भुकेसाठी,
जणू अंगत पंगत आहे !
खमंग उखाळ्या-पाखाळ्यांनी,
पत्रकार परिषद रंगत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7848
दैनिक झुंजार नेता
20फेब्रुवारी 2022

 



No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...