आजची वात्रटिका
----------------------------
मजबूरी
एक गेला की दुसरा,
भक्त गुरु चाफू लागतो.
भक्तांना नेहमी,
बाबा किंवा बापू लागतो.
बाबा किंवा बापूशिवाय,
भक्तांना गुरु मां चालते.
त्यांच्याशिवाय भक्तांचे,
पान तरी कुठे हालते.
भक्तांना गुरुचा,
गुरूला भक्तांचा लळा आहे!
तना-मनात फुललेला
भक्तीचा मळा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7831
दैनिक झुंजार नेता
1 फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment