आजची वात्रटिका
----------------------------
वैचारिक अस्पष्टता
कुणी तळ्यात; कुणी मळ्यात,
कुणाचे बुरखे फाटू लागले.
कुणाचे उतरले नकाब,
कुणी डबल ढोलकी पिटू लागले.
जे काल नितळ वाटायचे,
तेच आज उथळ वाटू लागले.
सगळे पितळ उघडे पडून,
संशयाचे ढग दाटू लागले.
काल ज्याला विरोध होता,
आज त्याचेच प्रतिपादन आहे!
धर्म हा साध्य असला तरी,
आज धर्माचेच साधन आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6408
दैनिक पुण्यनगरी
12फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment